फुग्यामुळे एका १३ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुगा फुगवत असताना मुलाच्या घशात फुगा अडकला. श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्याने मुलाच्या पालकांनी त्याला पठाणकोट येथील खासगी रुग्णालयात रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्या गळ्यात अडकलेला फुगा काढला. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे प्रकरण हिमाचल प्रदेश येथील कांगडा जिल्ह्यामधील एका गावातील आहे. मृत मुलगा सरकारी शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना त्याने फुगा खरेदी केला. पुढे वाटेत त्याने फुगा फुगवण्यास सुरुवात केली. त्यावेळी अचानक फुगा त्याच्या घशात अडकला. या अपघाताची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, मुलाची प्रकृती आणखी बिघडल्याने पालकांनी त्याला पठाणकोट येथील अमनदीप रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांना मुलाच्या गळ्यातील फुगा काढण्यात यश आले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडली. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याआधीही उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती, जिथे फुग्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाला. फुगा फुगवत असताना अचानक फुटला आणि घशात अडकला. त्यामुळे मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला त्वरीत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा असे मृत मुलीचे नाव आहे. अभिलाषा आपल्या आईसह जवळच्या व्यक्तीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमात अभिलाषा फुग्यांसोबत खेळत असताना अचानक फुगा फुटला आणि तिच्या घशात अडकला. यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर तिला त्वरित जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अभिलाषाचे वडील देवदत्त यांनी सांगितले की, फुग्याचा तुकडा अडकल्याने श्वास नलिका बंद झाली. यामुळे श्वास गुदमरून मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीचा मृत्यू झाल्याने कुटूंबीयांना धक्का बसला आहे.