लेखणी बुलंद टीम:
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ज्यामुळे ग्राहक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्वाल्हेरच्या आनंद नगरमध्ये येथे एका एका दहा वर्षांच्या मुलाला अंघोळ करत असताना साबणामधील ब्लेडमुळे जखम झाली आहे. अहवालानुसार, वडील अंगद सिंग तोमर यांनी 21 मे रोजी जवळच्या दुकानातून लोकप्रिय कंपनीचे साबण खरेदी केले होते. सोमवारी संध्याकाळी, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा अंश या साबणाने आंघोळ करत असताना अचानक साबणाच्या आतून एक ब्लेड बाहेर आले, ज्यामुळे मुलाच्या चेहऱ्यावर जखम झाली. मुलाने वडिलांना याची माहिती दिली असता साबणामध्ये ब्लेड आढळल्याचे पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर वडील अंगद तोमर यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या साबणाबद्दल तक्रार केली. अंगद यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. गरज पडल्यास प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशारा दिला आहे. कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्याचा विचार केला आहे, पण प्रथम ते ग्राहक मंचाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यांनी कंपनीकडून नुकसानभरपाई आणि उत्पादनाची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
लोकप्रिय कंपनीच्या साबणात आढळले ब्लेड:
सावधान, नए साबुन में निकला ब्लेड! MP News #MPNews #gwalior #soap pic.twitter.com/61uc5pbbOn
— MP News (@mpnewstv) May 27, 2025