बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळ कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बुलढाणा पोलिसांनी ही कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे आज बुलढाणा पोलिसांनी कारवाई करत मलकापूर शहराजवळ एका कारमधून 1 कोटी 97 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.औरंगाबादहून मलकापूरच्या दिशेने ही कार जात असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
कारमधील दोघांनी रोकडबद्दल समर्पक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. पुढील तपास बुलढाणा पोलीस करत आहेत.धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात दाखल झालं होतं, त्यांना देण्यासाठीच ही रक्कम असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होताजालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती.