नरेंद्र मोदी देशावर कर्जाचा डोंगर उभा करतील अन् संन्यास घेतो म्हणून निघून जातील, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

Spread the love

देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सनातन्यांना पुन्हा सत्तेत आणले तर दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे. सध्या देशावर 84 रुपयांचे कर्ज आहे. हे 2026 ला 100 रुपयांचे कर्ज करतील. देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्याचे सरकार हे डाकूंचे सरकार आहे असे मानायला हरकत नाही. देशावर कर्ज 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे होते. या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरुन 84 रुपयांवरती नेले. जागतिक बँकेने भारताला इशारा दिलाय. आपला पगार समजा 10 हजार आहे आणि बँकेचा 10 हजारांचा हफ्ता असेल तर आपली चूल कशी पेटणार ? आपली चूल देखील पेटू शकणार नाही.”, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. इचलकरंजी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी वायफळ बोलत नाही, चुकीचं काही बोलत नाही. मोदींच्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंगांच्या काळात 135 विमाने फ्रांसकडून विकत घ्यायची होती. सनातन वाल्यांनो किती राफेल आले सांगा आणि किती विकत घ्यायचे होते तेही सांगा. केवळ 35 विमाने आली. उरलेले 100 विमानं कधी येणार आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी देशाला बुडवत आहेत.

एका बाजूला देशाला बुडवणारा पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूने धारकऱ्यांच्या माध्यमातून दंगली पेटवल्या जात आहेत. सर्व दंगली धारकऱ्यांकडून घडवल्या जात आहेत,असा माझा आरोप आहे. एकदा आपल्याकडे पैसा राहिला नाही तर एकवेळ अशी येईल की, घरदार विकायची वेळ येईल, अंसही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करता कामा नये

ज्यांनी या देशाची संरक्षणाशी खेळलय. त्यांना पुन्हा पंतप्रधान करता कामा नये हे लक्षात घ्या. निवृत्त सैनिकांना माझं आव्हान आहे. सामान्य माणसाला लष्करातील कॉनवेची माहिती द्या. मी त्यांना आवाहन करतो, लष्करात असताना किती गाड्यांचा ताफा असतो आणि तेवढ्याच गाड्या का ठेवतात? याची माहिती सर्वसामान्य माणसाला द्या. पुलवामामध्ये त्यांनी तसं का केलं नाही, हे विचारा. मोदींना आम्ही विचारतो की, 80 गाड्यांचा ताफा कसा झाला. ज्या मेजरने 80 गाड्यांचा ताफा केला. त्याची चौकशी करा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *