मुंबईत मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार

Spread the love

मुंबईसह राज्यभरात सूर्य आग (Mumbai Tempreture) ओकत आहे, एवढा उन्हाचा तडाखा वाढला आहे. मात्र, वाढत्या गरमीत एक दिलासा दायक माहिती मिळत आहे. ती म्हणजे उन्हाळा फक्त दोन महिने राहीला आहे. एप्रिलचा चालू महिना आणि मे. कारण, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता 88-90% आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मान्सून (Mumbai Rain Update) जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाजही वर्तवला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून असेल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल. त्याशिवाय, किनारपट्टीची राज्ये केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागांत विशेषतः अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीच्या तुलनेत थोडासा कमी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *