सोन्या-चांदीच्या दरात चढउतार, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ७ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८८,२३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८०,८७८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ८८,८७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ८८३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,७३१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ८८,०७० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,७३१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८८,०७० रुपये आहे.

नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,७३१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८८,०७०० रुपये इतका आहे.

नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,७३१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८८,०७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *