‘भाजपा शिवाय देशाला, सांगलीला पर्याय नाही’- गोपीचंद पडळकर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जत विधानसभा मतदार संघाचे आमदार झाल्याबद्दल आणि खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खेचून आणलेबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार आणि भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी महायुती होणारी घुसमट व्यक्त केली आहे. ते बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे, असे सदाभाऊ खोत म्हणालेत. दुसरीकडे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना तुम्ही खासदारकीला उभे राहा आम्ही दोघे तुम्हाला खासदार करतो असे म्हणत तुम्ही खासदार व्हा, गोपीचंद मंत्री व्हा. तेव्हा मात्र मला कुठे राज्यपाल तर करा, नाहीतर आमची अवस्था बँड वाल्या प्रमाणेच व्हायचे असे सदाभाऊ खोत म्हणताच सभेत हशा पिकला.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?
दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कोणी केला असेल तर ते गोपीचंद पडळकर आहेत. गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही ज्यांना नेता म्हणलं ते आमचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत. तो पर्यंत कोणीही कितीही देव पाण्यात घालू द्या, काही उपयोग होणार नाही. मी सुद्धा लोकसभेला निवडणुकीत उभा राहणार आहे. पण आम्हाला नेहमी एक भीती वाटते. ती म्हणजे अडनावाची.

पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमचं बॅड वाल्यासारखं व्हायचं. बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. तशी आमची अवस्था झाली आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पडळकरांचा जयंत पाटलांना टोला
दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे अजून तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे म्हटलं आहे. त्याचे कुठे जायचे ते अजून नक्की नाही. मात्र आपल्या सगळ्याच्या विरोधात ताकदीने लढायचे हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे असं म्हणत जयंत पाटील यांना आता गट, पक्ष, विचार नाही असे म्हणत पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांनी डिवचलं. दुसरीकडे भाजपा शिवाय देशाला, सांगलीला पर्याय नाही. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवू असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केलाय.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *