लेखणी बुलंद टीम:
माणूस आयुष्यात कधीतरी कोणाच्यातरी प्रेमात पडतो आणि त्यालाही आयुष्यभर त्याच्या प्रेमात राहायचं असतं. पण जेव्हा एखादा मुलगा दोन मुलींच्या प्रेमात पडतो आणि त्याला दोन्ही मुलींसोबत आयुष्य घालवायचे असते तेव्हा काय होते? अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केले आहे. पण पुढे जे काही झाले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…
ही घटना तेलंगणामध्ये घडली आहे. एका तरुणाने एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण तेलंगणामधील कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील आहे. सूर्यदेव नावाच्या माणसाने लाल देवी आणि झलकारी देवी या दोन मुलींशी एकाच वेळी विवाह केला आहे. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर सूर्यदेवने दोन्ही वधूंची नावे छापून घेतली आणि एक भव्य सोहळाही आयोजित केला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या लग्नाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही महिला वधूच्या रुपात दिसत आहेत. त्या दोघीही लग्न केलेल्या पुरुषाचा हात धरताना दिसत आहेत. लग्नाचे सर्व विधी नातेवाईक व कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडले. असे सांगितले जात आहे की सूर्यदेव लाल देवी आणि झलकारी देवी यांच्या प्रेमात पडला होता, त्यानंतर तिघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीला गावातील वडीलधारी मंडळी या लग्नासाठी तयार नव्हती, पण नंतर त्यांनी होकार देत तिघांचे लग्न लावण्यात मदत केली.
यापूर्वीही अशी घटना घडली आहे
हिंदूंसाठी एकाच वेळी दोन महिलांशी लग्न करणे हे परंपरेच्या विरोधात आहे. मात्र, सूर्यदेवने ही परंपरा मोडली असून एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केले आहे. अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी २०२१ मध्ये तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन महिलांशी लग्न केले होते. त्याचप्रमाणे 2022 मध्ये झारखंडमधील एका तरुणाने त्याच्या दोन मैत्रिणींसोबत लग्न केले होते.
https://twitter.com/umasudhir/status/1905649014563111191