सोन्याच्या किंमतीत तडाका, जाणून घ्या सोन्या-चांदीचा भाव

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

गेल्या आठवड्यात सोन्याने 1300 रुपयांचा तडका लावला होता. सुरूवातीला सोन्याने ग्राहकांना 110 रुपयांचा दिलासा दिला होता. त्यानंतर किंमतीत सतत वाढ होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी दर वधारले. गुरूवारी 220 रुपयांनी किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

एक लाखांचे एक कोटी, ते तीन शेअर कोणते? ग्रोक AI ने केले मोठे भाकीत
चांदीमध्ये मोठी वाढ

चांदीने सोन्याशी स्पर्धा सुरू केली आहे. या सोमवारी चांदी 100 रुपयांनी उतरली. मंगळवारी 1100, बुधवारी 1000 रुपये तर गुरुवारी 100 रुपयांनी किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,100 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,506, 23 कॅरेट 88,152, 22 कॅरेट सोने 81,072 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,380 रुपये, 14 कॅरेट सोने 51,776 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,392 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *