सांगली आटपाडी : २४/११/२०२३
पुढे बोलताना म्हणाले जे वातावरण आपल्या घरात असते तशीच मुलं घडतात आपण वाचाल तर मुलं वाचतील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिका सर्वांनी पाहिली पाहिजे मुलंही झाडासारखी आहेत. त्यांना योग्य विचारांचे खतपाणी घातलं पाहिजे संविधानानुसार बालकांना मोफत शिक्षण मिळते शिक्षण नसेल तर आपली अवस्था फुटबॉल सारखी होईल असे मत प्रकाश कदम सर यांनी व्यक्त केले.
शिक्षणामुळे समता बंधुता समानता निर्माण होणे अपेक्षित आहे असे यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले प्राध्यापक उत्तम मोटे सर यांनी आत्ताच्या युवा पिढीसाठी शिक्षण किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले. शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत अशी केवळ अफवा आहे. आपल्या मुलांना शिकवून पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विचार मंचाचा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. या मंचावर अनेक मुलं घडतील मीही याच शाळेचा विद्यार्थी आहे असे यावेळी उत्तम मोटे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
स्वागत अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्यासोबत असलेले सर्व टीम व लहान मुलांचे कौतुक केले. व सांगितले की संविधान सत्ता घेण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या लहान मुलापासून ते सर्वांना संविधान समजले पाहिजे आपल्यातील शेवटच्या लोकांपर्यंत सर्व संविधानातील अधिकार समजले पाहिजे यासाठी हा उपक्रम राबवत आहे. हे नववर्ष चालू आहे पुढील वर्षी यापेक्षा अधिक मोठा कार्यक्रमाचे नियोजन करून महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आणून व्याख्यानमाला अधिक जोमाने काम करेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सविधान प्रस्ताविका वाचन करून करण्यात आली तसेच प्रमुख मान्यवरांचे सत्कार अध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या हस्ते संविधान प्रत व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आली.
प्रस्तावित जनार्दन मोटे सर यांनी केले.व आभार प्रदर्शन ऋतुजा काटे यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते लक्ष्मण मोटे सर, सनी पाटील सर, किरण सोहनी सर, विजय पवार सर, सतीश करडे सर, दीपक सावंत समाधान खरात राजेश मोटे विलास धांडोरे चंदन बाबर मारुती ढोबळे आदित्य सातपुते मारुती ढोबळे, नितीन तोरणे, संजय मोटे, चांगदेव ऐवळे,विकास मोटे ,रोहित काटे, वैभव मोटे,
सुष्मिता मोटे, कविता खरात, प्रतिभा सावंत, पुनम ऐवळे, रविंद्र माने विशाल काटे आदी मान्यवर उपस्थित होते