औरंगजेबाचे कौतुक केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी अडचणीत सापडले आहेत. मुघल सम्राटाची प्रशंसा केल्याच्या त्यांच्या विधानावरून आज विधानसभेतही मोठा गोंधळ झाला. त्यानंतर अबू आझमी यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. सपा आमदारांना विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबित ठेवण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला.
अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करत, तो जुलमी नव्हता असे म्हटले. त्यांच्या या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून राजकारण तापले होते. मात्र, नंतर त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आणि आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की,, ते फक्त इतिहासात जे लिहिले आहे तेच बोलले. या टिप्पणीमुळे अबू आझमी यांना त्यांच्या विरोधकांकडून सतत लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. आता त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले.
अबू आझमींवर कारवाई, संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित-
https://twitter.com/AHindinews/status/1897182266511778197