‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान तरुणांनी केली मस्ती, अशी घडवली मस्ती, पहा व्हिडिओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांनंतरही तुफान चर्चेत आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत. मात्र नवी मुंबईच्या कोपर खैराणे थिएटरमध्ये वेगळंच चित्र पहायला मिळालं. तिथल्या बालाजी मूव्हीप्लेक्स थिएटरमध्ये ‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्याने त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळतं. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. हाच सीन ‘छावा’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही. मात्र याच सीनदरम्यान थिएटरमधील पाच जण हसताना आणि मस्करी करताना दिसले. यावरून संतप्त झालेल्या इतर प्रेक्षकांनी त्यांना थिएटरमध्येच गुडघ्यावर बसून माफी मागण्यास भाग पाडलं.

 

https://twitter.com/Tawalkhorkart/status/1895441725927367011

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *