स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाचे आधीचे गुन्हे उघड ,सराईत गुन्हेगार…

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

स्वारगेट बस स्टँड परिसरात सोमवारी पहाटे 5.30 ते 6 च्या सुमारास एका 26 वर्षांच्या तरूणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. आरोपीने एकदा नव्हे तब्बल दोनवेळा त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तो फरार झाला. दत्ता गाडे असे आरोपीचे नाव असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. तरूणीवर अत्याचार केल्यानंतर आकोपी फरार झाला असून त्याचा फोनही बंद आहे. शिरूर आणि पुणे पोलिसांची एकूण 13 पथकं ही या आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

मात्र यासंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता हा सराईत गुन्हेगार असल्याती माहिती समोर आली आहे. त्याच्यावर याआधीच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे. आरोपी दत्ता गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे यामुळे उघड झाले आहे. त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक गुंतले आहे.

नेमकं काय झालं ?

पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती स्वारगेट एसटी डेपो परिसरात असताना एका आरोपीने तिच्याशी गोडबोलत ओळख काढली. त्यानंतर फलटणला जाणारी बस दुसरीकडे थांबली असल्याचं सांगितलं. ती तरूणी एकटी असल्याचा गैरफायदा त्याने घेतला. त्यानंतर आरोपी तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. त्याने तिला आत जाण्यास सांगितलं. तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला. त्याने तिथे तरुणीवर बलात्कार केला व तिथून पसार झाला.

आरोपीने एकदा नव्हे तर तब्बल 2 वेळा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला, त्यातून ही माहिती समोर आली.

दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा आढावा घेत परिवहन मंत्र्यांनी कडक निर्देश दिले असून बसस्थानकांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत. परळ बसस्थानकात 20 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. बसचे दरवाजे-खिडक्या लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शेवटच्या बसनंतर प्रवेशद्वार बंद करण्यात आल. रात्री शेवटची बस आल्यानंतर स्थानकातील नशाखोर आणि गर्दुल्ले यांना बाहेर काढून प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. १६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणीसाठी वाहतूक निरीक्षक नियुक्त, भंगार बसेस हटवून बस स्थानकात केवळ धावत्या बसेसच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *