ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या दुकानात रविवारी रात्री 23 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली रविवारी रात्री 10 :30 वाजेच्या सुमारास वंजारपट्टी नाका येथील वेदांत हॉस्पिटल जवळ आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आगीचे फोटो व्हायरल झाले असून आगीमुळे वाहनांची वाहतूक कोंडी झाली. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने अग्निशमन कार्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन दलाचे पाच बंब पाठवले.
आगीचे कारण अद्याप कळू शकले माही. आगीची चौकशी सुरु आहे अशी माहिती बीएनएमसी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.सुदैवाने या मध्ये कोणतीही जनहानी झालेली नाही. आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.