हैदराबादमधील आरके पुरम येथील ग्रीन हिल्स कॉलनी येथील रहिवासी रवितेजा मार्च 2022 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते आणि नोकरीच्या संधी शोधत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
अमेरिकेत अज्ञात हल्लेखोरांनी हैदराबादमधील 26 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या (Murder) केली. ही घटना वॉशिंग्टन अव्हेन्यूवर घडली, जिथे पीडित रवितेजा याच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. हैदराबादमधील आरके पुरम येथील ग्रीन हिल्स कॉलनी येथील रहिवासी रवितेजा मार्च 2022 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते आणि नोकरीच्या संधी शोधत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमेरिकेत गोळीबाराच्या अशा घटना सामान्य झाल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका तरुणाची शिकागोमधील एका पेट्रोल पंपावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.