7 व्या वेतन आयोगाची स्थापना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी 2014 मध्ये करण्यात आली होती. त्याच्या शिफारशी जानेवारी 2016 मध्ये अंमलात आणल्या गेल्या, ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ झाला. 8 व्या वेतन आयोगाची घोषणा केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या वेतन संरचनेत अद्ययावत करण्यासाठी मागणी करत असताना झाली आहे, जी महागाई आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चाला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आठवा वेतन आयोग आणि अपेक्षित शिफारसी
आयोगाची व्याप्ती आणि शिफारशींचा तपशील अद्याप उघड झाला नसला तरी, सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त देण्यास सुरुवात केली आहे. वृत्त आणि चर्चांमध्ये काही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्याचा दाव करण्यात येतो आहे. ज्यामध्ये खालील शिफारशी आघाडीवर आहेत:
पगारातील बदलः सध्याच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी समायोजन.
आयोगाने केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी सरकारने अद्याप कालमर्यादा जाहीर केलेली नाही. तथापि, जर मागील कलांचे पालन केले गेले तर तपशीलवार पुनरावलोकन आणि मंजुरी प्रक्रियेनंतर बदल लागू होऊ शकतात. 8 व्या वेतन आयोगाची अधिक अद्यतने आणि केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांवर त्याचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून दिल्या आणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवत चला.
दरम्यान, केंद्र सरकारने 2017 मध्ये लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगामुळे 2027 या आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीवर जवळपास 1.02 लाख कोटी रुपयांचा भार पडला असे एकआकडेवारी सांगते. त्यामुळे केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत विलंब लावला कारण नव्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्याची शिफारस तिजोरीवर आणखी भार वढविण्याची शक्यता आहे, याची सरकारला पूर्ण कल्पना होती आणि आहे, असे सांगितले जात आहे.