वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी कार्यकर्ते रस्त्यावर, महिलेचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिला उलटून गेला आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप झाले. या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे, राज्यभरात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे परळीत मात्र वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी आता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे.

महिला आक्रमक

वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन सुरू झालं आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महिला चांगल्याचं आक्रमक झाल्या असून अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी पाण्याच्या टाकीवर चढून देखील आंदोलन केलं आहे. याचदरम्यान एका आंदोलकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली आहे.

वाल्मिक कराडवर मकोका

दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर मकोका कयद्यांतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली होती. मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. सोमवारी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चाढून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला होता. अखेर आज वाल्मिक कराडवर मोकाका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडवर मोकोका अंतर्गंत कारवाई करण्यात आल्यानं आता परळीमधील त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, परळी बंदीची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्व दुकानं बंद करण्यात आले आहेत, सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आंदोलक चांगेलेच आक्रमक झाले आहेत. मकोका कारवाईनंतर आता या प्रकरणात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *