पूर्व दिल्लीतील शकरपूर (Shakarpur) भागात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची शाळेबाहेर चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित विद्यार्थी आणि इतर काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर ही कथित घटना घडली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका विद्यार्थ्याने त्याच्या तीन-चार मित्रांसह शाळेच्या गेटबाहेर पीडित विद्यार्थ्यावर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने पीडित मुलाच्या उजव्या मांडीवर चाकूने वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, एका विद्यार्थ्याने त्याच्या तीन-चार मित्रांसह शाळेच्या मुख्य गेटबाहेर किशोरवयीन मुलावर हल्ला केला. त्यानंतर या भांडणाला हिंसक वळण लागले. हल्लेखोरांपैकी एकाने किशोरच्या उजव्या मांडीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली.
सात संशयितांना घेण्यात आले ताब्यात –
गुन्हेगारांना पकडण्यासाठी शकरपूर पोलिस ठाण्याचे अमली पदार्थ विरोधी पथकासह ‘विशेष कर्मचाऱ्यांचे’ पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची हत्येमागची भूमिका आणि हेतू तपासण्यात येत आहे. मृत विद्यार्थ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल –
पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पोलिसांच्या एका पथकाला आरोपीला अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी या घटनेत सात जणांना ताब्यात घेतले असून त्यात पाच अल्पवयीन आणि 19 आणि 31 वयोगटातील दोन जणांचा समावेश आहे. याप्रकरणी शकरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.