महाराष्ट्र सरकारने नवीन वर्षी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत 26 जानेवारी रोजी सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी (School Holiday) देण्यात येत होती. मात्र, आता राज्य सरकारने ही सुट्टी रद्द केली आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day School) यापुढे शाळांना सुट्टी नसल्याची घोषणा राज्य सरकारने दिली आहे. त्याऐवजी, शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल, असे निर्देश शासनाने शालेय विभागाला दिला आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सरकारी आणि खासगी दोन्ही शाळांसाठी नवीन निर्देश दिले आहेत. परिपत्रकात असे म्हटले आहे की 26 जानेवारी 2025 पासून, सर्व शाळांनी देशभक्तीपर थीम असलेल्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये देशाचा इतिहास, संस्कृती आणि भविष्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश आहे. प्रजासत्ताक दिनासाठी अनिवार्य केलेल्या उपक्रमांमध्ये ध्वजारोहण समारंभानंतर ‘प्रभात फेरी’, वक्तृत्व, कविता, नृत्य, चित्रकला, निबंध लेखन, क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शने यांचा समावेश होतो. सर्व काही देशभक्तीवर केंद्रित असावे असे निर्देश देण्यात आले आहेत.