कुस्तीचा सराव सुरू असताना 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

पुण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव सुरू असताना माण तालुक्यातील माळवाडी गावातील 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. जय दीपक कुंभार असे या मुलाचे नाव आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा तो संकुलात प्रशिक्षण घेत होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

जयने कुस्तीमध्ये कमावले नाव –
जयचे वडील दीपक कुंभार यांनी आपला मुलगा नावाजलेला कुस्तीपटू (Wrestler) पाहण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्पप्न करण्यासाठी त्यांनी जनता राजा कुस्ती संकुलात जयची नोंदणी केली. 7 ऑगस्ट 2010 रोजी जन्मलेल्या जयने याआधीच कुस्तीमध्ये माळवाडी आणि आंधळी येथे स्थानिक पातळीवर नाव कमावले होते.

प्राप्त माहितीनुसार, जयने 14 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा आणि 17 वर्षांच्या वयोगटातील 62 किलो गटात विभागीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला होता. याशिवाय, खंडोबा यात्रेच्या कुस्ती स्पर्धेतही त्यांनी वाहवा मिळवली होती. दीपक कुंभार यांना आशा होती की त्यांचा मुलगा एक दिवस अव्वल कुस्तीपटू होईल आणि ऑलिम्पिक पदकही जिंकेल. मात्र, जयच्या आकस्मिक निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू –
डिसेंबरमध्ये जालना येथे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला होता. विजय पटेल असे मृताचे नाव होते. वृत्तानुसार, जालना येथील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमसच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विजयने सहभाग घेतला होता.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *