बापरे! वडिलांशी भांडण झाल्यानंतर 20 वर्षाच्या तरुणाने रागाच्या भरात गिळला शेव्हिंग रेजर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

वडिलांशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात शेव्हिंग रेजर गिळणाऱ्या 20 वर्षीय तरुणावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले.

मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाने ब्लेड होल्डर आणि हँडल अशा दोन भागात रेजर गिळला. त्याचे वडील देखील मानसिक आजाराने ग्रस्त आहे. दोघांमध्ये वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. तसेच त्याचा जीव वाचवल्याबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. तरुणाची आई म्हणाली की, “डॉक्टरांनी त्वरित कृती आणि काळजी घेतल्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि त्यांचे आभारी आहोत. सर गंगा राम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप म्हणाले, “या नाजूक शस्त्रक्रियेसाठी मी सर्जिकल टीमचे कौतुक करतो. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वसमावेशक दृष्टीकोनासाठी वचनबद्ध आहोत आणि मानसिक आरोग्य समस्या ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे आणि अशा व्यक्तींची काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *