मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट बुडाली, 13 जाणांना मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ बुडाली. बोट दुर्घटनेत १० प्रवासी आणि ३ नौदल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये ७ पुरूष आणि ४ महिला आणि दोन बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापपर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आलं असून बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती उद्यापर्यंत मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, या बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून ७ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. यानंतर बोटीवरील १०१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *