मराठ्यांनी त्याच्यावर बोलावे एवढी त्याची लायकी नाही छगन भुजबळ यांच्यावर घनाघात
18 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काही प्रतिक्रिया दिली नाही. पण आज साताऱ्याच्या सभेत मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्र सदनाला जनतेचा पैसा आणि खातोय ह्यो. माझी पाचवी काढतो तू. आधी काय करत होता हे सर्व माहीत”, अशा खोचक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “पुरावे नसल्यामुळे मराठ्याला मराठा आरक्षण मिळालं नाही. त्यावेळी पुरावे नव्हते तर आता नोंदी सापडतात कसे? हे सर्व षडयंत्र आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“कोणत्याही नोंदी नसताना 1967 मध्ये इतर आरक्षण दिले गेले. मात्र मराठा आरक्षण मिळाले नाही. मराठ्यांचा नोंदी सापडल्या इथेच मराठ्यांचा विजय झालाय. 70 वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाज प्रगल्भ झाला असता. त्यो एकटा 30 टक्के खातो आणि म्हणतो तुझ्या बापाच खातो का? माझ्या वाटेला लागलं तर मी सोडत नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
‘मी पाचवी शिकलो म्हणाले, पण…’
“मी पाचवी शिकल्याचे ते सांगतात, पण सरकारने माझे शिक्षण किती आहे, यावरच तीन दिवस घातलेत, हे लक्षात घ्यावे.जरांगे-पाटील पुढे म्हणाले, लोकांचे खाल्ले की त्यांचा तळतळाट लागतो. आधी तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, तुम्ही कोणच्या पाहुण्याकडे राहून जगलात, हे सर्वांना ठाऊक आहे. तुमच्याकडे काहीही नव्हते आणि एवढी संपत्ती कशातून आली हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टाचा पैसा ओरबाडून खाल्ला म्हणूनच तुम्हाला तुरुंगात जावे लागले, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.भूजबळ यांनी टिका करताना सर्व सीमा पार केल्या. महात्मा फुले, राजर्षि शाहू, यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला एक वेगळा आदर्श दिला. किमान महात्मा फुले यांचा आदर्श त्यांनी स्वत:समोर ठेवून त्यांनी बोलायला हवे होते. जाती-जातीत दंगली घडवण्याची भाषा केली जाते. परंतु, त्यांचे स्वप्न पूर्ण होवू देणार नाही. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यात कोणतीही तेढ निर्माण होवू द्यायची नाही, या राज्यात शांतता राहिली पाहिजे, ही जबाबदारी मराठ्यांनो, तुमच्या खांद्यावर आहे. मराठे आरक्षणात गेले हे लक्षात आल्यानेच जातीय दंगली घडतील, अशी वक्तव्ये करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव असल्याचे जरांगे-पाटील यावेळी म्हणाले पण मला बघायला वेळ नाही. तो म्हणतो आम्ही 60 टक्के, त्याने एक टोळी केलीय, असं समजलं. कुणीही गाफील राहु नका. मराठ्यांनी 70 टक्के लढाई जिंकलीय. महाराष्ट्रात 75 वर्षात सर्व पक्षांना माझ्या बापजाद्यांनी मदत केली. त्यातला आज एकही आरक्षणासाठी डोकवेना. राजकारण करा. पण स्वत:च्या मुलाचं वाटोळं करु नका. आरक्षण मिळाल्यावर कोणाचाही झेंडा उचला. तोपर्यंत काही नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.