मोठी अपडेट! मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली,घ्या जाणून

Spread the love

लेखणी  बुलंद टीम:

मोठी बातमी समोर येत आहे. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कोणंत खातं मिळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. येत्या रविवारी 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 34 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे 23 मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 मंत्री असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे 17 शिवसेनेचे 10 आणि अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यावेळी गृह आणि अर्थ असे दोनही महत्त्वाची खाती असणार आहेत.

भाजपाचे संभाव्य मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
प्रवीण दरेकर
मंगलप्रभात लोढा
बबनराव लोणीकर
पंकजा मुंडे
आशिष शेलार किंवा योगेश सागर
संभाजी निलंगेकर
जयकुमार रावल
शिवेंद्रराजे भोसले
नितेश राणे
विजयकुमार गावित
देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
गोपीचंद पडळकर
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
दादा भुसे
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
मंगेश कुडाळकर
अर्जुन खोतकर
भरत गोगावले
संजय शिरसाट
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
प्रकाश सुर्वे
योगेश कदम
बालाजी किणीकर
प्रकाश आबिटकर
दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं नागपुरातही घडमोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *