सुप्रिया सुळेंची फडणवीसांना ‘लाडक्या बहिणीं’ संदर्भात मोठी मागणी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्यातील लाडक्या बहिणींना १ जानेवारी पासून २१०० रूपये देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. “देवेंद्रजी म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होतं आहे. डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर महिना सुरु झाला आहे, पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा १ जानेवारी २०२५ पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करावे. आम्ही तर म्हणतो तीन हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना तीन हजार रुपये देणार होतो” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हफ्त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या २१०० रूपयांसंदर्भात तरतूद करण्यात येणार असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ‘नागपूरच्या अधिवेशनात यासंदर्भात विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची तातडीने अमलंबजावणी कऱण्याचा प्रयत्न सरकारचा असेल.’, असे संजय शिरसाट म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *