महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होऊन अवघ्या 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. मुंबईत होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार होती. आज भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. यावेळी महायुतीने महाराष्ट्राची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.