‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, शेवटची सोशल मीडिया पोस्ट पाहून व्हाल हैराण?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या वडिलांच्या निधनानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री वयाच्या 30 व्या वर्षी स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीचा मृतदेह घरात टकलेल्या अवस्थेत आढळला आहे. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्ना आहे. हैदराबाद येथील घरात अभिनेत्री मृत अवस्थेत आढळली. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. शिवाय अभिनेत्री शेवटची पोस्ट देखील व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोभिता हैदराबाद येथील घरात मृत आढळून आली. 30 नोव्हेंबरच्या रात्री अभिनेत्रीने स्वतःला संपवलं असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्री इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. अभिनेत्रीचा मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शोभिता हिचं फिल्मी करियर
शोभिता कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी होती. अभिनेत्री गेल्या दोन वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होती. अभिनेत्रीच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेले नाही. शोभिताने ‘गालीपता’, ‘मंगला गौरी’, ‘कोगिले’, ‘कृष्णा रुक्मिणी’ आणि ‘अम्मावरू’ यासह 10 हून अधिक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

शोभिता हिने मालिकांमध्येच नाही तर, काही सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेत्रीने एक्ट्रेस ‘एराडोंडला मूरू’ आणि ‘जॅकपॉट’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.

शोभिता हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर 16 नोव्हेंबर रोजी शेवटची पोस्ट केली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीने एका गिटार वाजवणाऱ्या गायकाचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अशात अभिनेत्री आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

instagram.com/reel/DCbe58WvixW

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *