पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती-उद्योगपती राज कुंद्रा याच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीने राज कुंद्राच्या घरावरच नाही, तर त्याच्या कार्यालयावरही छापे टाकले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी या रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्या घरावरच नव्हे तर इतरही अनेकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. मोबाइल अॅपच्या माध्यमातून अश्लील मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे या संदर्भात हा तपास करण्यात आला आहे. ईडीचा तपास मुंबई पोलिसांच्या २०२१च्या प्रकरणावर आधारित आहे.
गुन्हे शाखेने जुलै २०२१ मध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. राज कुंद्राने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.