महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. महायुतीच्या एकतर्फी विजयात अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ 58 जागा मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 128 उमेदवार उतरवले होते. मात्र एकही जागी त्यांना आघाडी ही घेता आली नाही. आघाडी सोडा एकही ठिकाणी मनसेचा उमेदवार दुसऱ्या जागी देखील त्यांचा उमेदवार नव्हता.
राज्यात युवा स्वाभिमान पक्ष, एमआयएम, समाजवादी पक्ष, शेकाप, जनसुराज्य पक्ष, बहुजन विकास आघाडी, माकप, राजर्षी शाहू विकास आघाडी यांनाही एक-दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. पंरतू मनसेला मात्र मोठी हवा करून देखील काहीच हाती लागले नाही.
अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत. मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील, तसेच बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांनाच पिछाडी मिळाल्याचे दिसते. काही दिवसापुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता, पंरतू जनतेने त्यांच्यावर विश्वास काही दाखवला नाही.