महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं असून आज त्याचे निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिल कल बारामतीचा हाती आला आहे. जेव्हा पासून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात तेव्हापासून बारामती मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. बारामती मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मानला जातो. यंदाही बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बारामतीकरांनी दिलेल्या कौलनुसार आज बारामतीचा दादा कोण याचा फैसला आज समोर येणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार हे विधानसभेच्या रिंगणात होते. अशातच बारामतीची पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. बारामतीमध्ये २६०० पोस्टल मतदान झालं होतं. या पोस्टल मतमोजणीतून पहिला कल समोर येताच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत. तर अजित पवार हे पिछाडीवर आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.