शरद पवार गटाच्या माजी आमदाराला जीवे मारण्याची धमकी, ‘बाबा सिद्दीकीप्रमाणे..’

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची क्लिप समोर आली आहे. यासंदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जिवाला धोका असून बाबा सिद्दींकीप्रमाणे (Baba Siddiqui) हत्या करण्याचा डाव असल्याचंही यावेळी बोलताना रमेश कदम म्हणाले आहेत.

आपल्या जीविताला धोका असून बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या करण्याचा डाव आहे, अशी तक्रार मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटकही केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ऑडीओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. मात्र, या ऑडीओ व्हिडीओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये उल्लेख आहे. पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीनं सुपारी दिल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर मुख्य आरोपी असलेल्या आबा काशीदचा शोध अद्याप सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?
“माझ्या जीवितला धोका, बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव आहे”, असा उल्लेख मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना अटक केली आहे. सध्या एक ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरु असल्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीनं सुपारी दिल्याचे फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी आबा काशीद याने सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. मागील पंधरा दिवसात रमेश कदम यांनी जीवितला धोका असल्याबाबत दुसऱ्यांदा पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, मुख्य आरोपी असलेल्या आबासाहेब काशीद यांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

तिन्ही आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 140(2), 140(3),62, 3 (5) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या जीवितास धोका असून मागील पंधरा दिवसात हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही’ अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *