धक्कादायक! निवडणूक रॅलीदरम्यान भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हल्ला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अमरावती (Amravati) येथे खल्लार गावात (Khallar Village) निवडणूक रॅली (Election Rally) दरम्यान भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राणा भाषण करत असताना काही जणांनी अपमानास्पद टीका करण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यानंतर तेथील लोक अधिक आक्रमक झाले, ज्यामुळे हिंसक संघर्ष झाला.

प्राप्त माहितीनुसार, भाजप नेत्या शांततेत सभेला संबोधित करत असताना काही लोकांनी दुरूनच त्यांच्या भाषणात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. व्यत्यय येऊनही राणा यांनी आपले भाषण चालूच ठेवले. यावेळी, हल्लेखोरांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या आणि त्यांच्यावर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली.

नवनीत राणा यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, ‘जेव्हा मी मंचावरून खाली आले, तेव्हा त्यांनी माझ्यावर शिवीगाळ करणे आणि थुंकणे सुरूच ठेवले. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या समर्थकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस हवालदारांवरही खुर्च्या फेकण्यात आल्या. हे सर्व पत्रकार आणि स्थानिकांसमोर घडले आणि समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. हल्लेखोरांनी जातीवर आधारित अपशब्द वापरला आणि प्रक्षोभक घोषणाबाजी सुरू ठेवली.’

या हल्ल्यानंतर, नवनीत राणा यांनी खल्लार पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आणि हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास हिंदू समाजाकडून या घटनेला प्रत्युत्तर म्हणून व्यापक निषेध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत तसेच प्रदेशातील वाढत्या तणावाबाबत चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा, पहा व्हिडिओ –

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *