छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनातून 19 किलो सोने आणि 37 किलो चांदी जप्त

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान, शुक्रवारी ‘स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम’ (SST) ने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका वाहनातून 19 किलो सोने आणि 37 किलो चांदी जप्त केली, ज्याची एकूण किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केलेले मौल्यवान धातू वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडे सुपूर्द केले आहेत. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ही जप्ती करण्यात आली.

एसएसटीने छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील निलोद फाटा परिसरात एका चारचाकीमधून 19 किलो सोने आणि 37 किलो चांदी जप्त केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केलेले मौल्यवान धातू वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडे सुपूर्द केले आहेत.

हा भाग सिल्लोड विधानसभा मतदारसंघात येतो. यासंदर्भात जीएसटी विभागाकडून पुढील तपास केला जाईल, असे ते म्हणाले. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *