दिवाळीच्या मुहूर्तावर सामान्य जनतेच्या खिशाला पडणार कात्री एसटीने केले भाडेवाढ , पाहा भाडेवाढ किती ?

Spread the love

दिवाळीच्या मुहूर्तावर सामान्य जनतेच्या खिशाला पडणार कात्री एसटी महामंडळाने केले भाडेवाढ एसटी महामंडळाने आपल्या तिकीट दरात वाढ झाली केली आहे. त्यामुळे दिवाळी निमित्ताने गावी जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला चांगलाच भार पडणार आहे.

 मुंबई : November 3, 2023 

एसटी महामंडळाने दिवाळी हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच होणाऱ्या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीने दिवाळी निमित्त गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. दरवर्षी एसटी महामंडळ महसूलवाढीसाठी सुट्यांच्या दिवसात परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार भाडेवाढ करीत असते.

एसटी महामंडळाने ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांना त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.

एसटी महामंडळाने ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत 

दिवाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळ अशा प्रकारची भाडेवाढ करण्याची एसटीला मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही उन्हाळी अथवा दिवाळी सुट्यानिमित्त एसटी महामंडळाची अशा प्रकारचे दरवाढ करीत असते. एसटी महामंडळाला कोरोनाकाळात मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच लांबलेला कामगारांचा संप यामुळे एसटीचे काम आणखीनच गर्तेत अडकले. एसटी महामंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत जाहीर केल्याने एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ हळूहळू आर्थिक गर्तेतून बाहेर पडत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *