मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. डेहराडूनमध्ये एक भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका जखमीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका इनोव्हाला कंटेनरने धडक दिली, त्यानंतर कारचे चक्काचूर झाले.
कंटेनरला धडकलेल्या इनोव्हा कारमध्ये 7 जण होते. यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून 1 रूग्णालयात दाखल आहे. अपघाताची शिकार झालेली कार बल्लूपूरहून कॅन्टच्या दिशेने जात होती. घटनेची माहिती मिळताच कॅन्ट कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना रुग्णालयात नेले.