धक्कादायक! ड्रग्सच्या घेतलेल्या आईने तिच्या 7 दिवसांच्या नवजात मुलीला जळत्या आगीत फेकले

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे ड्रग्सच्या आहारी गेलेल्या आईने तिच्या 7 दिवसांच्या नवजात मुलीला जळत्या आगीत फेकून दिले. या गुन्ह्यात मुलीच्या शरीराचा 50 टक्के भाग जळाला होता. मुलगी भाजल्यानंतर तिला उपचारासाठी प्रथम उन्नावमधील मियागंज सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) नेण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले, तर जखमेची गंभीरता लक्षात घेऊन मुलीला लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी पाठवण्यात आले. सध्या मुलीवर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनीही सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीला जळत्या चुलीत टाकले. त्यामुळे ती भाजली आहे.

यूपीच्या उन्नाव पोलिसांनी सोशल मीडियावर ट्विट करून ही माहिती दिली. कुटुंबीय मुलीला घेऊन सीएचसी मियागंज येथे गेले होते. तेथून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मुलीला लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी रेफर करण्यात आले. फिर्यादीकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

7 नोव्हेंबरची घटना:

ताज्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 7 नोव्हेंबर 2024 रोजी घडली.

पहा पोस्ट:

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *