आयव्हीएफ तंत्र ठरतय धोकादायक, पाहुयात काय आहेत तोटे ?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

हल्ली करीअर आणि इतर कारणांनी उशीरा लग्न आणि मुलांना जन्म घालण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतू प्रदुषण आणि बदललेले राहाणीमान यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे दर सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. मुल जन्माला येत नसल्याने अनेकजण IVF तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. याला सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब बेबी म्हटले जाते. परंतू IVF तंत्रज्ञानातही काही धोके आहेत.

IVF तंत्रज्ञान म्हणजे काय ?
जेव्हा महिला काही कारणांनी अंडबिजाचे फलन करु शकत नाही. तेव्हा लॅबोरेटरीत तिच्या स्री अंडबिजाचे कुत्रिमरित्या फलन केले जातो. या प्रयोगात महिलांच्या अंडबिजाला पुरुषांच्या स्पर्मने फलन केले जाते. यातून गर्भधारणा केली जाते. आणि भ्रूणाचा विकास करुन नंतर ते भ्रूण महिलेच्या गर्भाशयात पुन्हा टाकले जाते.

संशोधनात काय आढळले ?
IVF तंत्रज्ञानाने जन्माला आलेली मुलांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन जन्माला आलेली मुले अधिक सुदृढ असतात. आयव्हीएफ तंत्राने जन्माला आलेल्या मुलांना हृदया संबंधीत आजार होण्याची शक्यता 36 टक्के जास्त असते. या संशोधनात, तीन दशकात डेनमार्क, फिनलॅंड, नॉर्वे आणि स्वीडन येथे जन्माला आलेल्या 7.7 दशलक्ष लोकांच्या डाटाचा समावेश केला होता. संशोधनात आढळले की आयव्हीएफने जन्मलेल्या मुलांना गर्भात किंवा जन्माला येण्याच्या पहिल्या वर्षात गंभीर हृदय संबंधी आजार आढळला. परंतू असा धोका नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या मुलांमध्ये कमी आढळला.

कोणत्याही प्रजनन तंत्राने जन्मलेल्या मुलांमध्ये नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत हृदया संबंधीचे आजार असण्याचे प्रमाण जास्त आढळल्याचे स्वीडनच्या गोथेनबर्ग युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक उल्ला-ब्रिट वेनरहोम यांनी म्हटले आहे. तसेच या मुलांमध्ये वेळेच्या आधी जन्म होण्याचा धोका तसेच वजन कमी असल्याचे प्रमाणही जास्त असते.

उशीरा मुल जन्माला घालू नये
आयव्हीएफ तंत्रज्ञान केवळ त्याच लोकांसाठी आहे जे नैसर्गिकरित्या आपल्या मुलांना जन्माला घालू शकत नाहीत. त्यामुळे आरोग्यदायी मुलांना जन्म देण्यासाठी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी आपल्या आहार आणि प्रकृतीची नीट काळजी घ्यावी असे तज्ज्ञांचा सल्ला आहे.लग्न योग्य वयात करावे,लग्नास जास्त उशीर करु नये. उशीरा मुलांना जन्म घालण्याचे नियोजन करु नये. कारण त्यामुळे मुलांमध्ये अनेक कॉम्पलीकेशन्स येऊ शकतात.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *