यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तरूणीला अटक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

                      मुंबई  पोलिसांकडून (Mumbai Police) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी 24 वर्षीय ‘मानसिक रूग्ण’ तरूणीला अटक केली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबईत बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्याप्रमाणे हत्या केली जाईल असं म्हटलं होतं. सध्या पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या तरूणीचं नाव फातिमा खान आहे. फातिमा ही उल्हासनगरची तरूणी आहे. तिच्या कुटुंबासह ती कळंबोली मध्ये राहते. फातिमाचे शिक्षण BSc in Information Technology झाले आहे पण पोलिसांच्या माहितीनुसार ही तरूणी मानसिकरित्या स्थिर नाही.

सीएम योगी आदित्यनाथ यांना धमकी
मुंबई ट्राफिक पोलिसच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबर वर सीएम योगी आदित्यनाथ यांनी धमकीचा मेसेज केला होता. जर योगी आदित्यनाथ 10 दिवसात मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले नाहीत तर त्यांची मुंबईत 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या केली जाईल.

पोलिसांनी वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देखील सुरू आहे. प्राथमिक तपासामध्ये हा संदेश फातिमाने व्हॉट्सअ‍ॅप नंबर वर केल्याचं दिसत आहे. त्यानुसार मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) उल्हासनगर पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत महिलेचा शोध घेतला आणि तिला अटक केली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी धमकीचा मेसेज आल्यानंतर लगेचच पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. यूपीचे मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत.

दरम्यान दसर्‍याला वांद्रे पूर्व भागामध्ये बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमध्ये बिष्णोई गॅंग़चा हात असल्याचा प्राथमिक अंदाज असून तसा तपास सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *