लेखणी बुलंद टीम:
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या 75 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलॆल्या माहितीनुसार ही घटना खुटर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार “गुरुवारी रात्री वृद्ध महिला घरात झोपली असतांना त्यानंतर वृद्ध महिलेच्या नातवाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या आरोपी नातवाने आजीला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी या घटनेनंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे असे पोलीस अधिकारींनी सांगितले.