मुंब्राजवळील शिळफाटा परिसरात सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक 

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

शिळफाटा परिसरात एका खाजगी बँकेजवळील तात्पुरत्या शेडमध्ये तीन फर्निचरची दुकाने आणि एक भंगार दुकान उभारण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच खासगी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंब्राजवळील शिळफाटा परिसरात (Shilphata Area) तात्पुरत्या उभारलेल्या दुकानांना आग (Fire) लागली. या आगीत चार दुकाने जळून खाक झाली. तसेच एका गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला. शिळफाटा परिसरात एका खाजगी बँकेजवळील तात्पुरत्या शेडमध्ये तीन फर्निचरची दुकाने आणि एक भंगार दुकान उभारण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच खासगी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या पथकांनी तासाभरात आग विझवण्यात यश मिळवले. पहाटे साडेतीनच्या सुमारास आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रभावित दुकानातील लाकडी सोफा, कपाट, बेड आणि इतर फर्निचर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याने लक्षणीय नुकसान झाले आहे.
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात कापड कारखान्यात आग –

 

मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एका कापड कारखान्यात भीषण आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, आलमगंज येथील हनुमान साइझिंग कापड कारखान्याला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही वेळातच या आगीने उग्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोहोचल्या. या वेळी अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र कापड कारखाना अरुंद गल्ल्यांमध्ये असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली.

दरम्यान, ज्या कारखान्याला आग लागली त्या कारखान्यापासून दूर निवासी भाग असून तिथपर्यंत आग पसरण्याचा धोका होता. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी लोकांना आजूबाजूच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. दिवाळीच्या फटाक्यांमुळे कारखान्याला आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या कारणाचा तपास करणार असल्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी सांगितले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *