रतन टाटा यांच्या निधनानंतर मृत्यूपत्र समोर,कोणाला काय-काय मिळणार?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. 9 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला, ते 86 वर्षांचे होते. आयुष्यभर अतिशय साधं, सरळ जीवन जगणारे रतन टाटा हे अतिशय उदार होते, हे तर सर्वश्रृत आहेच. पण जातानाही त्यांनी या उदार स्वभावाचं दर्शन घडवलं. रतन टाटा यांच्या निधाननंतर त्यांचे मृत्यूपत्र आता समोर आलं असून त्यामध्ये त्यांनी खास तजवीज केली आहे. या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांचा लाडका पाळीव श्वान ‘Tito’ याच्यासाठीही संपत्तीचा काही भाग ठेवला आहे. तसेच त्यांचे कूक रजन शॉ आणि 30 वर्षांपासून बटलर सुब्बैयाह याच्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांचा सहकारी शंतून नायडू याचं नावंही मृत्यूपत्रात आहे.

एका रिपोर्टनुसार, रतन टाटा यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 10,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यांचा भाऊ जिमी टाटा, त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जीभोय यांच्यासाठी टाटा यांच्या नावाचाही मृत्यूपत्रात उल्लेख असून त्यांच्यासाठीदेखील काही भाग ठेवण्यात आला आहे. तर उर्वरित बहुतेक संपत्ती त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशनला देण्यात आली आहे ही टाटा कुटुंबाची परंपरा आहे.

रतन टाटा यांचं श्वानप्रेम सर्वश्रृत आहे. त्यांना कुत्र्यांचा फार लळा होता. त्यांनी सुमारे 6 वर्षांपूर्वी ‘टिटो’ या जर्मन शेफर्ड कुत्र्याला दत्तक घेतलं होतं. त्यांच्याकडे आधी जो श्वान होता, त्याच्याच नावावरून याचंही नाव टिटो असं ठेवण्यात आलं. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात या ‘टिटो’साठीही खास तजवीज करण्यात आली असून त्यानुसार, टिटो हयात असेपर्यंत त्याची अमर्याद काळजी ( unlimited care) घेण्यात येईल. भारतात, एखाद्या व्यक्तीने आपल्या संपत्तीतील काही भाग त्याच्या पाळीव प्राण्याच्या नावावर ठेवणे हे थोडं नवलाचं, नवं असून शकतं. पण परदेशात फार पूर्वीपासून ही परंपरा आहे.

एवढंच नव्हे तर टाटा याच्याकडे बऱ्याच कालावधीपासून कूक म्हणून काम करणारे राजन शॉ आणि त्यांच्यासाठी 30 वर्षांहून अधिक काळ बटलर म्हणून कार्यरत असलेले सुब्बैयाह यांच्या नावाचाही त्यांच्या मृत्यूपत्रात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या घरातील स्टाफशी त्यांचं एवढं घनिष्ट,जिव्हाळ्याचं नातं होतं की परदेशातून येताना रतन टाटा अनेकदा त्यांच्यासाठी डिझायनर कपडे आवर्जून आणायचे. घरात काम करणाऱ्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी रतन टाटा यांनी मृत्यूपत्रात विशेष तजवीज केली आहे.

शांतनू नायडूचं कर्ज माफ

गेल्या अनेक वर्षांपासून रतन टाटा यांच्या सोबत काम करणारा त्यांचा सहकारी, जवळचा मित्र शांतनू नायडू हा सर्वांनाच परिचित आहे. त्यांचे अनेत फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टाटा यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावेळीही शांतनू सतत त्यांच्या आजूबाजूला होता. याच शांतनू नायडूच्या नावाचाही मृत्यूपत्रात उल्लेख आहे. शांतनूच्या ‘Goodfellows’ या स्टार्टअपमध्ये रतन टाटा यांची भागीदारी होती, ती आता संपुष्टात आली आहे. एवढंच नव्हे तर शांतनूने परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी जे कर्ज घेतलं होतं तेही माफ करण्यात आलं आहे.

याशिवाय रतन टाटांच्या संपत्तीचा अधिक वाटा टाटा सन्स आणि टाटा ग्रुपला देण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांची इतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भागिदारी आहे. ती आता टाटा एंडाऊनमेंट फाउंडेशन (RTEF)ला ट्रान्सफर केली जाणार आहे. ही फाउंडेशन नॉन प्रॉफिट असणाऱ्या कामांसाठी फंडिंग करेल. एवढेच नव्हे तर टाटांनी पर्सनल कॅपेसिटीत स्टार्टअप्समध्ये जी गुंतवणूक केली होती, त्याची लिक्विडिटी करून ते पैसे या फाउंडेशनला वर्ग केले जाणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *