मुंबईतील मालाडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालाड मध्ये एका 19 वर्षीय तरुणीने उंच इमारतीवरून खाली उडी घेत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई मधील मालाड परिसरात मंगळवारी दुपारी एका 19 वर्षीय तरुणीने एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे एका पोलीस अधिकारींनी सांगितले.
तसेच तरुणीने दुपारी दीडच्या सुमारास एसव्ही रोडवरील ट्रायम्फ टॉवरच्या 23व्या मजल्यावरून खाली उडी घेतली . घनश्यामदास सराफ महाविद्यालयात ती बीबीएच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तरुणीने हे पाऊल का उचलले याचे कारण अजून समजू शकले नाही.