लेखणी बुलंद टीम:
केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात चोरीची घटना समोर आली आहे. येथून पितळेचे भांडे चोरल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी हरियाणा राज्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपींना तिरुअनंतपुरम येथे आणण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पद्मनाभ स्वामी मंदिरातून चोरीला गेलेल्या पात्राला स्थानिक भाषेत ‘उरुळी’ म्हणतात. उरुळी हे कांस्यपासून बनवलेले पारंपारिक पात्र आहे. या प्राचीन मंदिरातील पूजा आणि विधींसाठी याचा वापर केला गेला आहे.
याप्रकरणी केलेल्या कारवाई बाबत पोलिसांनी रविवारी सांगितले की, आरोपींची ओळख पटली आहे. हरियाणा पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा व्यवसायाने डॉक्टर आहे. एवढेच नाही तर त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन नागरिकत्वही आहे.