डीजेच्या मोठ्या आवाजामुळे  हृदयविकाराचा झटका येऊन 12 वर्षांचा मुलाचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भोपाळ येथे दुर्गा विसर्जन मध्ये गेलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुर्गा मूर्ती विसर्जनात सहभागी असलेल्या 12 वर्षांचा मुलगा बेशुद्ध झाला आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मुलगा बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हा हृदयविकाराचा झटका असल्याचेही मानले जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास बिल्लौर हे आपल्या कुटुंबासह साईबाबा नगरमध्ये राहतात. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा समर बिल्लौर हा पाचवीत शिकत होता. सोमवारी तेही परिसरातील लहान मुलांसमवेत परिसरातील दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी गेले होते. मूर्ती दर्शनासाठी नेत असताना मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात असताना अचानक समर बेशुद्ध पडला. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले.डीजेच्या आवाजामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समरचा मोठा भाऊ अमर याने सांगितले.

काही दिवसांपूर्वी भोपाळ पोलिसांनी 91 डीजे चालकांवर कायदेशीर कारवाई केली आहे. डीजेच्या अति आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलिसांनाही शांतता व सुरक्षा राखण्यात मोठी अडचण आली. त्यानंतर पोलिसांनी या डीजे चालकांवर कारवाई केली आणि आता त्यांचे 91 डीजे जप्त करून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *