“सरकार आलं तर बहिणींना तीन हजार रुपये देणार”- मंत्री गुलाबराव पाटील

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर आता जनतेला आस्वासनं दिली जात आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसै वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. महिलांना पगार मिळू नये, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नयेत, म्हणून राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले कोर्टात गेले आहेत. पण आम्ही ठरवलं आहे सरकार आलं तर बहिणींना तीन हजार रुपये देणार आहोत. आमचं सरकार आले नाही तर हे पगार बंद करणार आहे आणि बहिणींना माहित आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

लाडकी बहिण योजनेवर काय म्हणाले?
कडकी असलेल्या बहिणीला पैसे देऊन आम्ही मडके डोक्यावर ठेवायला लागले. पैसे दिले म्हणून काहीतरी महिला बाजारातून आणायला लागल्या. ही काही साधी गोष्ट आहे का?आयुष्यात कोणाला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं आहे. त्यामुळे बोलायचा भात आणि बोलायची कढी झालेली आहे. या बहिणीच त्यांना आडवा करणार आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीबाबत काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामिण मतदारसंघातून निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीमध्ये कोणाला आपण कमी लेखत नाही. पण मला जनतेवर विश्वास आहे. मी केलेली काम आणि जनतेशी ठेवलेला संपर्क… मी मतदानापुरता लोकांशी जोडलेला आहे, असं कोणी कधीच म्हणू शकत नाही. पदावर असो की नसो आयुष्यभर मी जनतेची सेवा करता आलेलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे विकासाच्या मुद्द्यावर, कार्यकर्त्यांच्या भरोशावर पुन्हा मी निवडून येईल असा मला विश्वास आहे. प्रत्येकाला वाटते की मी निवडून येईल मलाही वाटते की मी निवडून येणार आहे, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकशाही मधला सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आहे. यातलं सर्वात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे मतदान आहे. मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे लोकांनी ठरवलेलं आहे. उमेदवार तयारीमध्ये आपल्या सर्व पक्षांचे आहेत. आजपासून खरी रंगात विधानसभेची सुरू झालेली आहे. आम्हाला खात्री आहे, पुन्हा एकदा आमचं सरकार राज्यात येईल. असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *