कधीकाळी क्लीन शेव केली जात होती. परंतु आता काही जणांकडून दाढी ठेवली जाते. बॉडी टाइप आणि जॉबच्या हिशोबाने क्लीन शेव की दाढी असा पर्याय अनेक युवक निवडतात. अनेक जण रोज सकाळी दाढी करतात. तर काही लोक अनेक महिने दाढी करत नाहीत. दाढी करणे ही पुरुषांसाठी सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु दररोज दाढी करणे फायदेशीर आहे की हानिकारक? असा प्रश्न पडतो.
नियमित स्वच्छता गरजेचे
प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. युगल राजपूत म्हणतात, दाढी ठेवल्यामुळे कोणाच्याही त्वचेला कोणतीही हानी होत नाही. परंतु जी लोक दाढी ठेवतात, त्यांनी त्याची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. कारण आपण बाहेर पडतो तेव्हा चेहऱ्यावर धूळ, जंतू, तेल जमा होतात. त्यामुळे बाहेर जाऊन आल्यावर फेस वॉश किंवा साबणाचा वापर करुन चेहरा धुवावा. दाढीची नियमित स्वच्छता केली नाही तर संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात आणि त्वचा जळजळ करु शकते.
नियमित दाढी करावी का?
नियमित दाढी करावी का? या प्रश्नावर डॉ. युगल राजपूत म्हणतात, नियमित दाढी केल्यास कोणतीही हानी किंवा नुकसान होत नाही. योग्य ट्रिमर किंवा रेझर वापरल्यास रोज दाढी केली तरी चालेल. परंतु काही जणांच्या मते, आठवड्यातून एकदा दाढी करणे सर्वात फायदेशीर आहे. कारण त्यामुळे त्वचेला नुकसान होण्याचा धोका कमी असतो. रोज दाढी करायची की नाही हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे.
…तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
ज्या लोकांची त्वचा जास्त संवेदनशील असते आणि दाढी केल्यावर त्यांना जळजळ होते त्या लोकांनी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य शेव्हिंग क्रीम किंवा जेल न निवडल्याने त्वचेचे नुकसान होते. तसेच दाढी करण्याची योग्य पद्धत नसल्यास नाजूक त्वचेवर कट पडण्याचा धोका असतो. यामुळे चांगल्या दर्जाचा लेझर वापरुनच दाढी करावी.