लेखणी बुलंद टीम:
दिल्लीत पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला असून दोन विदेशी तस्करांसह तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून तीन कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
याआधीही देखील दोन छाप्यांमध्ये 5600 कोटी रुपयांचे कोकेन आणि दुसऱ्या छाप्यात 2000 कोटी रुपयांचे कोकेन सापडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला असून दोन विदेशी तस्करांसह तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच तस्कर नायजेरियातून कोकेन आणून राजधानीत तस्करी करत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त केले आहे.