राज ठाकरे लोकसभेत लुटणाऱ्यांच्या मागे उभे होते; संजय राऊत यांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

दसऱ्याच्या निमित्त राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी दसरा म्हटलं आपण सोनं लुटणं, एकमेकांना शुभेच्छा देणं हे आपण दरवर्षी करत असतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटलं जात आहे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे अगदी बरोबर बोलत आहेत. पण ते लुटणाऱ्यांच्या मागे लोकसभेत ते उभे राहिले होते. सत्ताधारी लुटण्याचा काम करत आहेत. ते महाराष्ट्र लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे मागे उभे राहिले त्यांना ते समर्थन देत आहेत. मुंबई लुटण्याचा काम रावण करत आहेत. या रावणाचे दहन अखेर होईल. महाराष्ट्रात नवीन रावण उभे राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं संजय राऊत म्हणालेत.

दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाले?
मुंबईच्या दादरमधील शिवाजीपार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ या देशामध्ये एकच मेळावा होतोय. जिथे विचारांचं सोनं लुटलं जात आहे तो म्हणजे शिवतीर्थावरील सेनेचा दसरा मेळावा… एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा होत होता… पण आता मेळाव्यांची लाट आली आहे. ड्युप्लीकेट लोक मिळावे करतात. पण ज्याची स्थापना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

देश चोरांच्या हाती- संजय राऊत
तुम्ही नाव आणि चिन्ह चोरला असेल पण कधीही विचार मूळ शिवसेनेसोबत राहतील. जो निवडणूक आयोग मोदी शाह यांच्यावर चालतो. त्यांना शिवसेना कोणाचीही सांगण्याचा अधिकार नाही. आज प्रचाराचा रणशिंग फुंकला जाईल यासमोर पिपाण्या चालणार नाहीत. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जिंकेल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

आमचा धनुष्यबाण मोदी आणि शहांच्या मदतीने चोरला आहे. हा देश चोरांच्या हाती आहे. हुतात्म्यांच्या स्मारकात देखील त्यांच्या हातात मशाल दिसते आणि तीच मशाल जळणार आहे. कॅबिनेटमध्ये 50-50 निर्णय एकावेळी घेतले जात आहेत. उद्घाटनं सुरू आहेत. पण त्याने लोकांची मतं मिळणार नाहीत, असंही संजय राऊत म्हणालेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *