माण-खटाव विधानसभा निवडणुकीत वंचित ने आंबेडकरी जनतेला पर्यायी मार्ग दिला
इम्तियाज नदाफ हे मागील वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत निस्वार्थ सेवा करत आहेत. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता परंतु आज विधानसभा लढवण्यासाठी प्रकाश आंबेडकरानी परिश्रमाचे फळ दिले आहे . तालुक्यातील जनतेला मुस्लिम समाजातील सामान्य घरातील उमेदवार देऊन माण तालुक्याला जनतेला पर्याय मार्ग दिला आहे . संधीचे सोने करतील अशी अपेक्षा व्यक्त करत इम्तियाज नदाफ यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले.
पैशाच्या जोरावरती आतापर्यंत जे मतांची पेटी आपल्या पदरात टाकत राज्य करत होते त्यांची नक्कीच झोप उडवणार अशी इम्तियाज नदाफ यांनी प्रतिक्रिया दिली.
मुस्लीम फक्त वोट बँक नाही.
ॲड. प्रकाश आंबेडकर मुस्लिमांना प्रतिनिधित्व देऊन उभ्या महाराष्ट्राला सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्यावतीने राज्यभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवाराची घोषणा करण्यात आली. वंचित बहुजन पक्षाच्या वतीने माणमधून इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी देण्यात आली.
वंचितचे १० उमेदवार जाहीर…
सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय वंचित बहुजन पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये सातारा मतदारसंघासाठी १३, वाई ७, कऱ्हाड उत्तर ९, कऱ्हाड दक्षिण ६, पाटण ५, फलटण १२, कोरेगाव मतदारसंघासाठी ६ जणांच्या मुलाखती झाल्या. वंचितकडून अनेक दिग्गजांनी उमेदवारी मागितली असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, महासचिव अरविंद आढाव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राज्यातील १० विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघाच्या उमेदवाराचा समावेश आहे. माणमध्ये इम्तीयाज जाफर नदाफ यांना उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही लवकरच जाहीर होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.