रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचा पुढील वारसदार म्हणून निवड

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टची जबाबदारी आता त्यांच्या खाद्यांवर आली आहे. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते. ते आता रतन टाटा यांचा वारसा चालवणार आहेत. रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. तर गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ही नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

पारसी समाजाची अगोदरच मंजूरी

नोएल टाटा यांच्या नावावर पारसी समाजाने अगोदरच शिक्कामोर्तब केले होते. टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी असा समाजाचा आग्रह होता. तर रतन टाटा यांनी मात्र टाटा अडनाव असलेली व्यक्तीच या पदावर असेल असे नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले होते. पण नोएल टाटा अगोदरच टाटा समूहाशी संबंधित अनेक विश्वस्त मंडळात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड होणार हे जवळपास निश्चित समजण्यात येत होते. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन उपाध्यक्ष आहेत. यामध्ये टीव्हीएस के वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघेही 2018 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *